पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुकलवाडी येथील तरुणांचा पुढाकार: घरोघरी जावू केले धान्य गोळा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुकलवाडी येथील तरुणांचा पुढाकार: घरोघरी जावू केले धान्य गोळा

पुरंदर- नीरा

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराणे थैमान घातले आहे.या पूर ग्रस्थांना मदत करण्याचे आवाहन सर्वच स्तरातून होतंय. त्यामूळे प्रेरित होऊन तालुक्यातील छोटे गाव असलेल्या तरुणाने पुढाकार घेतलाय.

काल रात्री आणि आज सुकलवाडीतील घोरोघरी जाऊन तरुणांनी मदत गोळा केलीय. या उपक्रमाला सर्व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत, मदत केली. ही मदत लवकरच कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांनी पर्यंत पोचवली जाणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार, सुकलवाडीचे उपसरपंच संतोष बोलचंद्र पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष नारायण पवार, अभीषेक दुर्गाडे, देविदास सुर्वे, विठ्ठल पवार, दिनेश पवार, अमित झेंडे, मनोज घाटे, उमेश पवार, गणेश चव्हाण, मोनेश दाते, व इतर तरुण या उपक्रमांमध्ये सहभागी होते.
या उपक्रमाला सुकलवाडी ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्या बद्दल तरुणांनी ग्रामस्थांचे आभा मानाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *