पुरंदर हादरला!       ऐन यात्रेच्या दिवशी पुरंदर तालुक्यातील “या” गावातील एकाच परिवारातील तीन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुरंदर हादरला! ऐन यात्रेच्या दिवशी पुरंदर तालुक्यातील “या” गावातील एकाच परिवारातील तीन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुरंदर

थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथील तीन तरुणांचा लोणंद येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे

थोपटेवाडी येथील तरुण एका मोटरसायकलवर लोणंद येथे गेले होते यावेळी बस आणि मोटरसायकल यांचा अपघात झाला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालालोणंद -निरा रोडवर लोणंद पासून दोन किलोमीटर अंतरावरीलल रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एम एच 20 बी एल 4158 व निरेकडून लोणंद निघालेली मोटरसायकल क्रमांकएम एच 12 RV 3158 यांच्यात जोरदार धडक झालीयामध्ये ओंकार संजय थोपटे ( वय २२), पोपट अर्जुन थोपटे ( वय २३),अनिल नामदेव थोपटे (वय २५) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघा तरुणांची नावे आहेत.

विशेष म्हणजे ही तीनही तरुण एकच घरातील असून ते त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुले होती.या घटने नंतर पिंपरे आणि थोपटेवाडी गावात शोककाळा पसरली आहे.थोपटे वाडी येथील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा होती.गावात उत्सव साजरा होत असताना दुःखाची बातमी गावात गेली आहे.

लोणंद पोलीस घटना स्थळी पोहचले असून त्यांनी मृत देह ताब्यात घेतले आहेत. व शवविच्छेदनासाठी लोणंद येथील सरकारी दवाखान्यात पाठवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *