पुरंदर मधील बेशिस्त ग्रामसेवकांवर कारवाई करा.

पुरंदर मधील बेशिस्त ग्रामसेवकांवर कारवाई करा.

पांडुरंग देवकर यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी.

पुरंदर

पंचायत समिती पुरंदर कार्यालयातील बेशिस्त ग्रामसेवकांच्या कार्यालयीन कामकाजाची माहिती घेऊन दोषी ग्रामसेवक कर्मचारी यांच्यावर ठोस कारवाई करून शासकीय पगार तत्काळ थांबविण्यात यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग देवकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

मावडी(ता,पुरंदर)येथील माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग देवकर यांनी पुरंदर तालुका गटविकास अधिकारी अमर माने यांना मेल द्वारे निवेदन सादर केले आहे.या निवेदनात म्हटले आहे की पुरंदर तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांचे बेशिस्त,बेकायदा वर्तन दिसून आले आहे.यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुरंदर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे.

तसेच गटविकास अधिकारी स्तरावरून देखील कार्यालयीन कामकाज सिस्थ,शासकीय नियमाचे पालन करण्याच्या वारंवार सूचना दिल्या आहेत.तरी देखील पुरंदर मधील अनेक ग्रामसेवकांचे बेसिस्थ,बेकायदा वर्तन दिसून आले आहे.कार्यालयात वेळेवर उपस्थित नसणे ही गंभीर बाब असून नागरिकांच्या दृष्टीने घातक आहेत.तरी सदरील ग्रामसेवकांची भरारी पथकाद्वारे अचानक भेट देऊन कार्यालयीन कामकाजाची सखोल तपासणी करावी.

दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवकां वर ठोस कारवाई करून शासकीय पगार तत्काळ थांबविण्यात यावा.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व कार्यालयीन प्रमुखाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवकांवर पोलीस प्रशासनाकडून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी देवकर केली आहे.  शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांची डेली उपस्थिती असणे अपेक्षित आहे.

मात्र अनेक ग्रामसेवक आठवड्यातून दोन वेळा साजेच्या ठिकाणी उपस्थित राहतात.यामुळे नागरिकांची कामे मार्गी लागत नाही.वरांवर चक्रा माराव्या लागतात.कोरॉना प्रधिर्भवामुळे महाराष्ट्र शासन अडचणीत असताना देखील शासनाच्या कार्यालयात उपस्थित न राहता फुकट पगार घेणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई होणार का ? व शासनाची फसवणूक थांबणार का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

यापुढील कालावधीत पुरंदर पंचायत समिती मधील कार्यालयीन वेळेचे पालन न करणाऱ्या व कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित न राहणाऱ्या बांधकाम,वित्त विभाग,शिक्षण,सामान्य प्रशासन,पंचायत,मनरेगा,पशू संवर्धन,विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुस प्रसाद यांच्याकडे सादर करणार असल्याचे देवकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *