पुरंदर तालुक्यातील “हे” प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की private Hospital !!!!!रुग्णांना औषधे आणण्यासाठी चक्क खाजगी मेडीकलची देतात चिठ्ठी

पुरंदर तालुक्यातील “हे” प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की private Hospital !!!!!रुग्णांना औषधे आणण्यासाठी चक्क खाजगी मेडीकलची देतात चिठ्ठी

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी कर्मचा-यांची संख्या असल्याचा मुद्दा गाजत असताना आता औषधांचाही तुटवडा जानवत असल्याचे दिसुन येत आहे.येथील कर्मचारी दवाखाण्यात आलेल्या रुग्णांना औषधे आणण्यासाठी चक्क खाजगी मेडीकलची चिठ्ठी देतात .यामुळे सर्वसामान्य माणसांनी दवाखाण्यात यावे कि नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या कमी कर्मचा-यांमुळे अडचणीत आले आहे.त्यातच आता औषध पुरवठा देखील कमी आहे.याठिकाणी येणारे रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील आहे .दोन रुपये देऊन केसपेपर काढुन उपचार व्हावा ही आपेक्षा असते.विशेष म्हणजे अनेक रुग्ण फक्त केस पेपरसाठी दोनच रुपये घेऊन येतात .या ठिकाणी आल्यानंतर दवाखाण्यात नसलेल्या औषधांची चक्क चिठ्ठी लिहुन दिली जाते .ही औषधे खाजगी मेडीकल मधुन आणावी लागतात.

यासाठी सर्वसामान्य रुग्णांकडे पैसेच नसतात .मग औषधे आणायचीच कशाची हा प्रश्न निर्माण होतो .आरोग्य केंद्रात दोन वैद्यकिय अधिकारी आहेत पण अनेकवेळा दोघेही नसतात.यामुळे उपचार कसे घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.या आरोग्य केंद्राकडे वेळीच लक्ष न दिल्यास सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येणार आहे.

Comments

  1. त्या ठिकाणी देवकाते म्हणून एक व्यक्ती कामाला आहे, त्याची के गुणवत्ता म्हणून त्याला कामाला ठेवले आहे समजत नाही, काहीच काम करत नाही. आपण काही काम घेऊन गेले तर तो आपल्या काढून करून घेतो , त्याला साधा birth Certificate चा फॉर्म भरता येत नाही,

    फुकटचा पगार घेतो फक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *