पुरंदर तालुक्यातील “या” बसस्थानकात महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी हत्याराने कट करून नेल्या चोरून

पुरंदर तालुक्यातील “या” बसस्थानकात महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी हत्याराने कट करून नेल्या चोरून

पुरंदर

सासवड बस स्थानकातून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी हीसकाउन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून  सुगंधा गंगाराम शिलनकर वय ७५ वर्ष, व्यवसाय-सुखवस्तू रा.हडपसर हाडेंवाडी रोड चिंतामणी नगर गल्ली नंबर ५ यांनी सासवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे

सासवड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार दि.१६/०२/२०२२ रोजी सकाळी ११:३० वा.चे.सुमारास  मौजे सासवड  बस स्टँड  येथे  यातील फिर्यादी यांनी सुगंधा शिलनकर यांनी  फिर्याद दिली आहे की  त्यांच्या  उजव्या हातातील ७५०००/- रू.किंमतीची दिड तोळयाची सोन्याची बांगडी त्यावर डिझाईन कोरलेली एका अनोळखी इसम व त्याचे दोन साथीदारांनी मिळुन सगंनमताने जबरीने कशाच्या तरी साहयाने कट करून चोरून नेली आहे.

त्या चोरांना पुन्हा पाहील्यास त्या ओळखु शकतात तसेच चोरलेली बांगडी सुध्दा पाहील्यास त्या ओळखु शकतात अशी त्यांची  तीन अनोळखी चोरटया विरूध्द तक्रार आहे.सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *