पुरंदर तालुक्यातील “या” गावात वीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; एकाने भूषवलं गावचे सरपंचपद तर दुसऱ्याने उपसरपंचपद

पुरंदर तालुक्यातील “या” गावात वीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; एकाने भूषवलं गावचे सरपंचपद तर दुसऱ्याने उपसरपंचपद

     

पुरंदर

क्षेत्र कोडीत, तालुका – पुरंदर, जिल्हा – पुणे येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कृषी औद्योगिक विद्यालय या माध्यमिक शाळेच्या दहावी २००४ साली शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी उत्साहात पार पडले.


शाळेतील २००४ च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मिळून शिक्षकांचा सन्मान आणि सर्व जुन्या वर्ग मित्र मैत्रिणींच्या भेटीचं नियोजन करून या कार्यक्रमाचा पाया रचला. त्यासाठी श्री. गरुड सर, श्री. बडधे सर, श्री. नावडकर सर, श्री.तावरे सर, सौ.रिस्वडकर मॅडम, सौ.खैरे मॅडम, श्री. सावंत सर, विद्यमान मुख्याध्यापक श्री. म्हस्के सर,श्री.अण्णा खैरे, श्री. उत्तम लकडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रीसवडकर सर यांना निमंत्रित करण्यात आले होते.


वीस वर्षानंतर जवळपास सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी या क्षणी एकत्रित आले. वर्गासमोर सुंदर रांगोळी काढण्यात आली. आपल्या त्याच दहावीच्या वर्गात त्याच बेंचवर बसून सर्व शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्वागत केले. सरस्वती पूजन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सर्वात ज्येष्ठ असलेल्या सौ.रिसवडकर मॅडम यांना देण्यात आले. मान्यवरांचे शाल , श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

त्यांनतर सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी स्वतःची ओळख नाव आणि सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्राची माहिती देऊन केली त्या बरोबरच आपण आपल्या मित्र मैत्रीणीना गरजेच्या वेळी कोणत्या प्रकारची सहाय्यता करू शकतो याची प्रामुख्याने माहिती दिली त्याचा उपयोग नक्कीच कठीण प्रसंगी सर्वांना होईल.

यातील अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत, काही खाजगी क्षेत्रात तर काही व्यवसायात आहेत. महत्वाचे म्हणजे अनेक जण बाकी काम सोबत आपला पारंपरिक शेती व्यवसाय आधुनिक पद्धतीने यशस्वी रित्या करत आहे , याची नोंद निमंत्रित सर्व शिक्षकांनी घेतली आणि त्यांचे विशेष कौतुक ही केले. या बॅच मधील श्री.सूरज औचरे यांनी सरपंच तर श्री.अमोल बडधे यांनी उपसरपंच म्हणून ग्रामपंचायत मध्ये काम करताना आपल्या कामाचा ठसा समाजकार्यात उमटवला आहे.


कार्यक्रमात पुढे सर्व शिक्षकांना त्यांचा स्वभाव आणि छोट्या छोट्या जुन्या आठवणी यांना उजाळा देत संवाद करण्यात आला आणि सध्याच्या परस्थितीवर आधारित प्रश्न ही विचारण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद देत सर्व निमंत्रित शिक्षकांनी त्यांचा जीवनपट उलगडून समोर मांडला. तसेच प्रश्नांना उत्तर देताना बदलती परस्थिती आणि त्यातील चांगले वाईट मुद्दे यावर भाष्य करत पुढील वाटचालीसाठी मोलाचं मार्गदर्शन आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना केलं.

त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी श्री.अमोल बडधे यांच्या मिमीक्री कलेने आणि श्री. विजय (अण्णा) भोसले यांनी गायलेल्या ‘कणा’ या प्रसिद्ध कवितीने वातावरण भारावून गेले. सर्व शिक्षकांना गरूमाऊली यांचं प्रतीक म्हणून विठ्ठल रुखमाई ची मूर्ती तसेच शाळेची आठवण म्हणून शाळेचा सुंदर फोटो आणि विशेष मजकूर असलेली फ्रेम भेट दिली.

शेवटी नियमाप्रमाणे अध्यक्षीय भाषण होऊन सांगता झाली. सरते शेवटी एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन , आनंदी आणि आठवणीत राहील असा या दिवसाचा समारोप एकत्रित ग्रुप फोटो काढून करण्यात आला.
या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन छोट्या छोट्या कामातून आपल्या शाळेला विविध प्रकारे मदत केली आहे.


या कार्यक्रमाची संकल्पना सौ.पल्लवी शेंडकर, सौ.आरती चांदेरे, सौ.सुजाता गद्रे, सौ मयुरी तुपे यांची होती त्यांना बाकी सर्व मैत्रिणींनी साथ दिली. कार्यक्रमाची सर्व व्यवस्था श्री.सूरज औचरे यांनी केली त्यांना मोलाची साथ श्री.रमेश सोनवणे, श्री. दत्तात्रय पठारे, श्री. समीर बडधे यांनी दिली बाकी मित्रांनी ही उत्तम सहकार्य केले. या कार्यक्रमाचे निवेदन श्री. महेश जरांयांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *