पुरंदर
पुरंदर तालुक्यातील परिंचे या गावातील प्रकाश शंकर कुचेकर यांनी आपल्या पत्नीस ( स्वाती प्रकाश कुचेकर) यांना मोटरसायकल घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आण असे म्हणून पैसे न दिल्याच्या व सात वर्षे लग्न होवून देखील मूल झाले नाही म्हणून फिर्यादी यांचे चारित्र्यावर संशय घेऊन तू आमच्या घरी राहावयाचे नाही, तुला आम्हाला नादंवायचे नाही असे म्हणून आमच्या घरी राहायचे नाही , तू इथे राहू नको तू तुझ्या माहेरी जाऊन रहा असे बोलून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला.
पती यांनी दारू पिवून येवून आमच्या घरी राहायचे नाही,तू घराचे बाहेर जा तू येथे राहू नको असे म्हणून लोंखडी सळईने माझे दोन्ही पायाचे मांडीवर ,उजवे पायाचे पोटरीवर मारहाण करून आपखुशीने दुखापत केली आहे.माझे सासूने मला हाताने मारहाण करून शिवीगाऴ व दमदाटी केली आहे. म्हणुन पती प्रकाश शकंर कुचेकर सासु सौ.पार्वती शंकर कुचेकर रा.परिंचे ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली खोमणे करित आहेत.