पुरंदर तालुक्यातील “या” गावात पेटता टेंभा घेऊन केला पाठलाग;जमिनीच्‍या वादातून काकाकडून पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्‍न

पुरंदर तालुक्यातील “या” गावात पेटता टेंभा घेऊन केला पाठलाग;जमिनीच्‍या वादातून काकाकडून पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्‍न

पुरंदर

रॉकेट टाकून एकाला पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथील घटना असून काका पुतण्याचा जमिनीवरून वादातून हा प्रकार झाला आहे. याबाबत जेजुरी पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

इतिहासामध्ये काका मला वाचवा असं आपण वाचलय. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे ‘काका मला मारू नका’ असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली. पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय.हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारत आहे. शेतात झालेल्‍या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आईसुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *