पुरंदर तालुक्यातील ” या” गावात धनदांडग्यांनी ग्रामपंचायतीचा बंधाराच फोडला

पुरंदर तालुक्यातील ” या” गावात धनदांडग्यांनी ग्रामपंचायतीचा बंधाराच फोडला

पुरंदर

तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील जमिनीला सोन्याचे भाव आलेत तसेच झेंडेवाडी (ता पुरंदर) येथे बिल्डरने आपल्या भूखंडातून जाणारे नैसर्गिक स्तोत्र असणारा ओढा मुरूम, माती, दगड टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी या कामास विरोध दर्शवला आहे धनदांडग्यांकडून ओढा गिळंकृत होत असताना संबंधित विभाग व प्रशासन गप्प का असा सवाल ग्रामस्थ करत आहे.

झेंडेवाडी येथील जलस्त्रोत, पाझर तलाव, माती बंधारे अंदाजे ५० वर्षापूर्वीचे आहेत हे शासनामार्फत दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करण्यात आले तसेच पाझर तलाव शासनामार्फत मस्यपालन करणेकरिता लिलावही केले जातात तसेच ओढा, पाझर तलाव, माती बंधारे राजेश गोयल यांच्या मार्फत नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहे त्यामुळे गावातील शेतकरी व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावात पाणी टंचाईग्रस्त असल्याने पाणी साठा टिकविणे गरजेचे आहे. यासाठी जलस्रोतांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

झेंडेवाडी गावठाणाच्या उत्तर-पूर्व बाजूस असलेला गट नंबर १,२ व. १८ येथील गावाचा पारंपारिक जलस्त्रोत, ओढा व ओढ्यावरील माती बंधारा राजेशकुमार गोयल व इतर यांनी जे.सी.बी यंत्राद्वारे फोडला व याठिकाणी असलेला ओढा बुजविण्यात आला असून गावासाठी अत्यंत उपयोगी असलेला पाणीसाठा नष्ट करण्यात आला आहे.
गावात वर्षानुवर्षे पाण्याची समस्या आहे. व ७ महिने पाणीसाठा असतो. यावर गावातील नागरिक, शेती, गाई अवलंबून आहेत. वर्षांच्या डिसेंबर ते जून पर्यंत टॅंकर पुरवले जातात व त्याकरिता शासन व जलसंधारण विभाग, अटल भूजत विभागामार्फत गावात जलसंधारणाची, भूजलसंधारणाची कामे करून झेंडेवाडी टंचाईमुक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. व झेंडेवाडी गाव पाणी टंचाई मुक्त कसे होईल यासाठी प्रयत्न करत आहे.

परंतु राजेशकुमार गोयल व इतर गावातील जलश्रोत, ओढे नाले, ओढयावरील माती बंधारे नष्ट करण्याच्या मागे लागले आहे. अनाधिकृत प्लॉटिंग व डेव्हलमेंट सुरु केले आहे. अनाविहन सपाटीकरण व खोदकाम करण्यान करून त्या ठिकाणी त्यामुळे शेतकरी, गुरे तेरे ग्रामक्याचे पाण्याचे अपरिमित नुकसान होणार आहे. तरी बाहनांना आपल्या विभागामार्फत ओटे, नाले ओल्या वडील माती बंधारे नष्ट करून प्लॉटिंग व डेव्हलपमेंट करण्याची परवानगी दिली आहे का ? दिल्ली असल्यास अश्या परवान्यांच अशी परवानगीची एक प्रत ग्रामपंचायतीस सादर करावी. तसेच या प्रकाराबद्दल, गावाने ग्रामसभेद्वारे तीव्र निषेध का केला आहे. त्यामुळे संबंधिताना सदरच्या अनाधिकृत करण्यापासून रोखण्यात यावे व त्यांच्यावर आपल्या मार्फत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *