पुरंदर तालुक्यातील “या” गावातून कंटेनरची चोरी ; माझ्यावर दोन मर्डरच्या केसेस आहेत असे म्हणत कंटेनर मालकाला दिली जीवे मारण्याची धमकी !!!!!

पुरंदर तालुक्यातील “या” गावातून कंटेनरची चोरी ; माझ्यावर दोन मर्डरच्या केसेस आहेत असे म्हणत कंटेनर मालकाला दिली जीवे मारण्याची धमकी !!!!!

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील देवडी येथे कंटेनर  चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबतीत संदीप बबनराव लांडगे वय ४६ वर्षे  यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार  फिर्यादी यांची पुरंदर तालुक्यातील देवडी येथे कापुरहोळ  सासवड रोड लागत ११ गुंठे  जागा आहे त्यालगतच  25 एकर क्षेत्र आहे. फिर्यादी यांनी  सुमारे दोन वर्षांपासून कापुरहोळ   सासवड रोड लागत एक लोखंडी कंटेनर ठेवला होता त्यामध्ये ते कन्स्ट्रक्शनचे साहित्य ठेवत होते.

दि . ३ जून २०२२  रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे देवडी येथील शेतावर गेले  असता त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारा कंटेनर त्यांना दिसला नाही म्हणून त्यांनी सासवड पोलीस स्टेशनला कंटेनर ठेवलेले ठिकाणी  दिसत नाही त्याबाबत माहिती कळवले त्यानंतर फिर्यादी यांनी  स्वतः कंटेनर बाबत आजूबाजूला चौकशी केली असता त्यावेळी एका  हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दि.२४  मे २०२२  रोजी रात्री ९.३०  वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या ट्रेलरवर फिर्यादी यांचा कंटेनर घेऊन जाताना त्यांना दिसला त्याबरोबर एक शिवप्रताप नावाची क्रेन दिसली  फिर्यादी यांनी क्रेन मालकाचा पत्ता शोधला असता तो शिराळा  तालुका खंडाळा जिल्हा सातारा असल्याचे  त्यांना समजले त्यावेळी ते त्याच्याकडे गेले असता शिवप्रताप क्रेन मालकाने   फिर्यादी यांना सांगितले की सागर कोंडे राहणार खेड शिवापूर यांनी त्याला कंटेनर उचलण्याची ऑर्डर दिली होती त्यानंतर  फिर्यादी यांनी सागर कोंडे यांच्याकडे खेड शिवापूर येथे जाऊन  विचारले असता त्याने सांगितले की जस्ट डायल वरून त्याला फोन आला होता कंटेनर उचलण्याची ऑर्डर राहुल गुजर राहणार सातारा याने  दिल्याचे  त्याने सांगितले व  त्याचे फोन रेकॉर्डिंग ऐकण्यास देखील दिले तेव्हा फिर्यादी यांची खात्री पटली की आरोपी राहुल गुजर याने  त्यांचा कंटेनर त्यांना न विचारता त्यांच्या जागेतून नेला  आहे.  

त्यांनी त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून कंटेनर परत आहे त्या ठिकाणी आणून देण्यास सांगितले परंतु त्याने फिर्यादी यांना कंटेनर मुंबई येथून जेएनपिटी न्हावाशेवा  येथून विकत घेतला आहे.,अशी माहिती दिली तसेच त्यानेफिर्यादी  यांना व्हाट्सअप वर बिल देखील पाठवले परंतु ते बिल खोटे असल्याचे फिर्यादी यांचे निदर्शनास आले फिर्यादी यांनी आरोपीस आज पर्यंत नेलेला कंटेनर परत आणून द्या अशी वेळोवेळी सांगितले परंतु त्याने मी कंटेनर  देणार नाही असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली व माझ्यावर दोन मर्डरच्या केसेस आहेत असे म्हणून मारण्याची धमकी दिली आहे .

फिर्यादी  यांच ४  लाख ५०  हजार रुपये किमतीचा एक चौकोनी लोखंडी कंटेनर लांबी ४०  फूट, रुंदी ८  फूट, उंची ९  फूट वर्णनाचा  कंटेनर आरोपीने क्रेन ट्रेलरच्या साह्याने चोरून नेला  असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून सासवड पोलिसांनी आरोपी राहुल गुजर राहणार सातारा जिल्हा सातारा याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *