पुरंदर तालुक्यातील “या” गावातील आरोपीस लैंगिक अत्याचार प्रकरणी वीस वर्षे सक्त कारावासासह दंडाची शिक्षा

पुरंदर तालुक्यातील “या” गावातील आरोपीस लैंगिक अत्याचार प्रकरणी वीस वर्षे सक्त कारावासासह दंडाची शिक्षा

पुणे

पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.कलम ३७६ आय,पोस्को कायदा व अनुसूचित जाती जमाती या मधील आरोपी पवन उर्फ प्रणव नरसिंह कुडाळकर वय २० वर्षे रा. जेजुरी जिल्हा पुणे यास मे. श्रीमती एस. व्ही. पोक्षे  शिवाजीनगर कोर्ट पुणे यांनी सबळ पुरावा आल्यामुळे आरोपीस ३७६ कलमा खाली २० वर्षे शिक्षा व ५० हजार रुपये  दंड न भरल्यास दोन वर्षे शिक्षा व पोस्को कायदा कलम ३ वर्षे शिक्षा व २५ हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास डी.वाय.एस.पी. आण्णासाहेब जाधव सध्या कर्जत उपविभाग अहमदनगर यांनी केला होता.

पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार सहा. फौजदार विद्याधर निचित तर कोर्ट पैरवी अमलदार एस. डी. भोसले, जेजुरी पोलीस स्टेशन यांनी  काम पाहिलेले आहे. तसेच सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती अरुंधती रासकर  यांनी कामकाज पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *