पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या पोलिस पाटलांच्याच गाडीवर मारला चोरट्यांनी डल्ला

पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या पोलिस पाटलांच्याच गाडीवर मारला चोरट्यांनी डल्ला

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील वाघापुर गावचे पोलिस पाटील असणारे विजय कुंजीर यांच्या मालकीची घरासमोर उभी असलेली दोन चाकी गाडी हीरो होंडा स्प्लेंडर MH -12 DF -7015 रात्री चोरीला गेली असल्याची माहिती विजय कुंजीर यांनी दिली आहे.

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात सध्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन गाड्या पळविण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसुन येत आहे.

एकाच आठवड्यात पुर्व भागात ही दुसरी घटना घडली असुन यापुर्वी आंबळे येथुनदेखील दोनचाकी गाडी चोरीला गेली होती.

चोरट्यांचा काही नेम नसल्याने सर्व नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षितता व खबरदारी घेऊन सर्वांनी जागरुक रहावे अशीच वेळ सध्या आली आहे.

तसेच सदर नंबरची गाडी कुठे आढळल्यास वाघापुर गावचे पोलिस पाटील विजय कुंजीर यांच्या ९४२०१६८४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *