पुरंदर तालुक्यातील महावितरण च्या गलथान कारभाराचा अप्रतिम नमुना

पुरंदर तालुक्यातील महावितरण च्या गलथान कारभाराचा अप्रतिम नमुना

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या आंबळे गावातील डीपी ची भयानक अवस्था कशी झाली व ही अवस्था का झाली याला कारण म्हणजे महावितरण विभाग

शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकासाठी लाईट महत्त्वाचे असते पण लाईट मिळते का? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो याचे उदाहरण म्हणजे आंबळे गावातील रामवाडी येथील ही डीपी.

याठिकाणी फ्युज तर नाहीतच पण फ्युजचे हे खोके आहे का तारा जोडण्याचे साधन हेच कळत नाही याबाबत राजेवाडीचे शाखा अभियंता ठोंबरे यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते उत्तर जर देत नसतील तर अशा अधिकाऱ्यांवर महावितरण कारवाई करणार का ? हाही मोठा प्रश्न आहे.

याबाबत सासवड येथील उप कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता मी सुचना देतो असे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *