पुरंदर तालुक्यातील खळबळजनक प्रकार! “या” गावातील पत्नीनेच घातला पतीला लाखो रुपयाचा गंडा व नंतर केली मारहाण

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक प्रकार! “या” गावातील पत्नीनेच घातला पतीला लाखो रुपयाचा गंडा व नंतर केली मारहाण

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील रिसे येथील रोहिदास लक्ष्मण कांबळे यांच्या घरामधील तसेच बँक ऑफ इंडिया पिसर्वे येथून संयुक्त खात्यामधून पत्नीने व इतर साथीदार यांच्या मदतीने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

बँकेच्या अधिकाऱ्यांना खोटे सांगून रोख रक्कम खात्यामधून लंपास केली.याप्रकरणी कांबळे यांच्या पत्नी पल्लवी कांबळे ,मुलगा अशोक कांबळे,मेव्हणी कविता अजय खरात ,अजय खरात, विजय कांबळे, अनिता कांबळे, धोंडाबाई दिगंबर जाधव सासूबाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने पतीला हडपसर येथे बोलावून तिच्या माहेरच्या मंडळीच्या मदतीने मशीनवर एक तासभर जबरदस्त झटका देण्यात आला आहे

त्यानंतर हडपसर येथील हाकलून देण्यात आले आहे .त्यामुळे रोहिदास कांबळे यांचे मानसिक संतुलन खूप बिघडले आहे .त्याला सर्वस्वी जबाबदार पल्लवी व तिच्या नातेवाईक यामध्ये सामील झाले आहे.

यामुळे खूप त्रास कांबळे यांना होत आहे.पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसो सांडभोर करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *