पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! “या” गावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! “या” गावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुरंदर

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर जेऊर फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडेत एकाचा मृत्यू  झालाय. अपघातानंतर स्थानिक लोकांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मूर्ती झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज शुक्रवारी दुपारी चार वाजलेच्या दरम्यान मृत दिलीप भुजंग थोपटे हे पिंपरे येथून सासवडला जाण्यासाठी आपल्या मोटार सायकल वरून निघाले होते. जेऊर फाटा येथे आले असता जेजुरी बाजूकडून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्यांना समोरून धडक दिली.

यामध्ये थोपटे गंभीर जखमी झाले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर नामदेव दगडू थोपटे यांनी नीरा येथील पोलीस चौकीत दिली आहे. याबाबत अधिकचा तपास  सहाय्यक फौजदार  संदीप मोकाशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *