पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना ! “या” गावच्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना ! “या” गावच्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

पुरंदर

हिवरे (ता पुरंदर) येथील सरपंच पुनम भरत कुदळे यांचे विरुद्ध रामदास दत्तात्रय कुदळे व इतर ६ यांनी मांडलेला अविश्वास ठराव ८ विरुध्द १ यामतांनी मंजूर झालेला आहे विशेष सभेस तहसीलदार विक्रम राजपूत यांनी अध्याशी अधिकारी म्हणून काम पाहिले तसेच ग्रामसेविका माधवी दीपक हरपळे यांनी सभेच्या इतिवृत्तांचे लेखांकन केले.

दरम्यान सरपंच पुनम कुदळे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता व मनमानी कारभार करने, आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मिळवून देतो अशी बतावणी करून एका बोगस एजंट मार्फत ४०० ते ५०० ग्रामस्थांकडून प्रत्येकी २०० रूपये घेणे, स्मशानभूमीतील विदयुत दहिनी परस्पर विल्हेवाट लावणे अशा अनेक तक्रारी करून देखील प्रशासकीय अधिकारी याकडे डोळे झाक करत होते अशी माहिती माजी सरपंच एम. के. गायकवाड यांनी दिली यावेळी कायदा व सुव्यवस्था कामकाज पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरक यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *