पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे भोवले ;पोलिसांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे भोवले ;पोलिसांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

निरा

नीरा (ता.पुरंदर) येथील भरत निगडे व राहुल शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, सीसीटीव्हीसाठी नागरिकांकडून अनधिकृत वर्गणी वसूल करणे तसेच खंडणी म्हणून एक लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीवर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी नीरा दुरक्षेत्रातील पोलिसांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तशी नोटीस पोलिसांना बजावण्यात आली आहे. 

भरत निगडे व राहुल शिंदे हे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी पोलिसांच्या विरोधात वार्तांकन केले होते. याचा राग मनात धरून पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची धमकी दिली. त्यांना एक लक्ष रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांनी अर्जदाराच्या तक्रारीनंतर दीड महिन्यांनी अट्रोसिटीची केस नोंद केली. सीसीटीव्ही बसविण्याचे गावातील लोकांना अमिश दाखवत लाखो रुपये अनधिकृतपणे गोळा केले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पोलिसांना पाठीशी घातल्याची तक्रार भरत निगडे यांनी करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार संबंधित पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याबाबत अर्ज केला.

परंतु, त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने खुद्द पत्रकारच सासवड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यानंतर हे प्रकरण बारामती अप्पर पोलीस अधिक्षक कर्यालय कडे पाठविण्यात आले. त्यानंतर आता नीरा पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी सहायक फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस हवालदार संदिप मोकाशी, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, हरिश्चंद्र करे, निलेश जाधव यांना चौकशी साठी बोलाविण्यात आले आहे.

दरम्यान, तक्रारदार भरत निगडें यांना आज म्हणणे सादर करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, निगडे यांना नोटीस देण्यात आली नाही तसेच त्यांना कल्पना देखील देण्यात आली नाही. तक्रारदार पुरावे सादर करण्यास अनुपस्थित राहिल्यास तक्रार निकाली काढली जाईल अशा आशयाची नोटीस खुद्द तक्रारदारांना बजावण्यात आली नाही.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरण बंद करण्याचे ठरविले. मात्र दुपारी तीन वाजता निगडे यांच्या एका हितचिंतक मित्राने त्यांना नोटीस पाठवली. तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते तर पुरावे सादर करण्याची वेळ सकाळी ११ ची होती. ही बनवाबनवी लक्षात आल्यावर निगडे यांनी थेट बारामती गाठली व आपले म्हणणे सादर केले. 

“चोर कोण व पोलीस कोण हे लोकांना लवकरच कळेल. पैशासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा निंदनीय प्रकार पोलिसांनी केला आहे. वेळ पडल्यास उच्च न्यायालयाचे दार ठोठावू पण न्याय मिळवूच. आमची अशी अवस्था असेल तर सामान्य लोकांना हे पोलीस कसे वागवत असतील याची कल्पना न केलेली बरी!” :  भरत निगडे, नीरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *