पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना!!!!सख्खा भाऊ झाला पक्का वैरी;जमिनिच्या वादात भावानेच केला सख्ख्या भावाचा खुन

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना!!!!सख्खा भाऊ झाला पक्का वैरी;जमिनिच्या वादात भावानेच केला सख्ख्या भावाचा खुन

पुणे

पुरंदर तालुक्यातील मावडी क प, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे दाजींरच्या शेतात बाजरीच्या पिकात इसम ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 हा मयत स्वरूपात आढळून आला होता. या प्रकाराबाबत जेजुरी पोलिसांकडून तपास सुरू होता या तपासांतर्गत गोपनीय बातमीदार मार्फत त्यांना अशी माहिती मिळाली की संबंधित मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे याचा व त्याचा सख्खा लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे या दोघांमध्ये जमिनीतील रस्त्यावरून वाद होता त्या अनुषंगाने जेजुरी पोलिसांनी चांगदेव भामे यास तपास कामी ताब्यात घेऊन चौकशी केली.

परंतु सुरुवातीला त्याने याबाबत बोलण्यास नकार दिला मात्र त्याला पोलीसी खाकया दाखवताच त्याने या खुनाचा कबुली जवाब दिला त्याने त्याच्या सख्खा भाऊ ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा जमिनीतील रस्ता अडवत असल्याकारणाने रस्ता देत असल्याने त्याला हाताने लाथा बुक्क्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. व त्यामध्ये डोक्यात मारहाण केली असल्याचेही सांगितले.

तसेच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय जेजुरी यांनी देखील पोस्टमार्टम करता सदर माहितीच्या डोक्यात गंभीर जखम झाले असल्याचे सांगितले. त्यावरून ज्ञानदेव लक्ष्मण भामे याचा खून त्याचा सख्खा भाऊ चांगदेव भामे यांनीच केलेले उघडकीस आले असल्याने दिनांक 2 ऑगस्ट रोजी त्याला जेजुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार बारामती विभाग उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, भोर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी,पोलीस हवालदार दशरथ बनसोडे,पोलीस हवालदार विठ्ठल कदम पोलीस हवालदार मुनीर मुजावर पोलीस हवालदार संदीप भापकर पोलीस कॉन्स्टेबल हेमंत भोंगळे यांच्या पथकाने केली असून सदर गुन्ह्चायाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *