पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावातील तलाठी व एका खाजगी इसमाला बक्षीस पत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी फक्त पाच हजार रुपयाची लाज घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
निलेश सुभाष गद्रे असे तलाठ्याचे नाव असून ते सोनोरी येथे गाव कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहेत.तर आदित्य मधुकर कुंभारकर हा तरुण वनपुरीचा आहे. या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फक्त बक्षीस पत्राची नोंद सातबारा उतारा वर करण्यासाठी तलाठी फक्त पाच हजार रुपयाची लाच मागत असतील आणि सामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरत असतील तर सामान्य शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची अशी चर्चा सध्या पुरंदर तालुक्यात रंगताना दिसत आहे.