पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बावीस वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दिनांक 02/06/2025 रोजी रात्री 10/30 वा चे सुमारास मौजे पारगाव मेमाणे गावचे हद्दीत मैराळवस्ती ता.पुरंदर जि.पुणे येथे कु.शुभम सतिश गायकवाड वय-22 वर्षे रा.बेलसर ता.पुरंदर जि.पुणे यास अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने हयगईने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ठोस देवुन अपघात करुन अपघातामध्ये हातास,पायास डोक्याला गंंभीर मार लागुन रक्तस्त्राव होवुन मुत्युस कारणीभुत होवुन खबर न देता पळुन गेला आहे.म्हणुन त्याचे वडील सतिश गायकवाड यांनी अज्ञात वाहनावरिल अज्ञात चालकाविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.
पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.लोंढे करीत आहेत