पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जेजुरी पोलिसात पीडित महिलेने तक्रार दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील पिसर्वे गावातील एका महिलेने या संदर्भात तक्रार दिली आहे तिने दिलेल्या तक्रारीनुसार घरामध्ये काम करत होती.
नितीन शिवाजी कोलते हा इसम तिच्या घरात आला आणि त्यांनी तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.त्यामूळे तिने जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजले च्या दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत अधिकचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सरक करीत आहेत.