धक्कादायक!!!!! पुरंदर तालुक्याच्या माजी अध्यक्षांची चारचाकी गाडी  दिली पेटवुन

धक्कादायक!!!!! पुरंदर तालुक्याच्या माजी अध्यक्षांची चारचाकी गाडी दिली पेटवुन

पुरंदर

पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विकास इंदलकर यांची चारचाकी गाडी रात्री अज्ञाताने पेटवुन दिल्याची घटना घडली आहे.

काल रात्री सिंगापुर याठिकाणी कॉंग्रेसची आढावा बैठक संपल्यानंतर जेवन करुन विकास इंदलकर हे आपल्या घरी ११:३० वा.गेले. त्यानंतर १२:१५ ते १२:३० च्या दरम्याण गाडी पेटल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर शेजारी असलेल्या बोअरवेलच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले आहे.परंतु गाडीचे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

गाडीशेजारी पेट्रोलची बाटली तसेच काडीपेटी सापडली असुन प्रथम गाडीच्या टायरवर पेट्रोल टाकुन टायर पेटवण्यात आल्यामुळे गाडीला भिषण आग लागल्याचे विकास इंदलकर यांनी सांगीतले.

घटनेची माहिती मिळताच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप तसेच युवक कॉंग्रेसचे महासचिव गणेश जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

विकास इंदलकर यांनी याबाबत जेजुरी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास सपोनि गावडे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *