पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील जागृत देवस्थानात झाली चोरी

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील जागृत देवस्थानात झाली चोरी

पुरंदर

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नवसाला पावणारे,जागृत देवस्थान व भाविकांचे श्रध्दास्थान असणारे नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे.

अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे,कुलूप तोडून मंदिरातील चांदीचे त्रिशूल व चांदीचे मखर(महिरप)अंदाजे साडेआठ किलो पर्यंतचा ऐवज चोरून नेले आहे. सिद्धेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.जागृत देवस्थान असल्याने या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असते.

सप्टेंबर २००९ मध्ये याच मंदिरातील चांदीचे मुखवटे व इतर ऐवज चोरी झाला होता.त्याचा तपास सुध्दा होणे गरजेचे आहे. ही घटना अतिशय गंभीर असून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत.दोन्ही गुन्हाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना ताब्यात घ्यावे: चंद्रकांत चौंडकर,माजी उपसरपंच,नायगाव,ता.पुरंदर

रात्री बाराच्या नंतर पुजारी पोपट जगताप मंदिरालगत असणाऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते.पहाटे पाचच्या दरम्यान नेहमी प्रमाणे घरी जात असताना त्यांना मंदिरातील दरवाजा व कुलूप तोडल्याचे दिसून आले.मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून चोरट्यांनी वरील चोरी केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *