पुरंदर
पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्षपदी आंबळे येथील नाजीम शेख़ यांची नुकतीच नियुक्ति करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तिचे पत्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रदिप गारटकर व हाजी सोहेल खान यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारसरणी अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असुन पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवुन युवकांची संघटना मजबुत करणार : नाजीम शेख, कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग,राष्ट्रवादी कॉंग्रेस,पुरंदर.
या अगोदर नाजीम शेख यांनी पुरंदर तालुका अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद ही भुषविलेले होते त्यामुळे त्यांच्यातील संघटनकौशल्य पाहता त्यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
या कार्यक्रमासाठी मा. आमदार अशोक टेकवडे,पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील,बंडुकाका जगताप, शिवादादा कोलते तसेच पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.