पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी उमेश इंदलकर

पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी उमेश इंदलकर

पुरंदर

पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी टेकवडी येथील उमेश इंदलकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे युवक कॉंग्रेस महासचिव गणेश जगताप यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.

अखिल भारतीय कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष राहुल गांधी,भारतीय कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास,महाराष्ट्र युवककॉंग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे,पुणे जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालीपरिसरातील युवक कॉंग्रेस ची संघटना शक्तिशाली व मज़बूत करणार असल्याचे उमेश इंदलकर यांनी सांगीतले.

या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र युवक काँग्रेस चे महासचिव गणेश जगताप,युवक कॉंग्रेस अध्यक्ष माऊली यादव, उपाध्यक्ष अक्षय उरसळ, दिवे गराडे गटाचे अध्यक्ष संदिप फडतरे,टेकवडीचे उपसरपंच सुरज गदादे,ग्रा.प.सदस्य बबन इंदलकर,सुखदेव खेड़ेकर,मधुकर खेड़ेकर,भाऊसाहेब दळवी,विकास इंदलकर,सनी खेड़ेकर तसेच कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *