पुरंदर
मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ संचलित पुरंदर तालुका पत्रकार संघाची नविन कार्यकारणी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश साहेबराव कामथे तर उपाध्यक्षपदी प्रविण सोपान नवले तर सचिवपदी अमोल अरविंद बनकर सचिवपदी मंगेश विनायक गायकवाड, कोषाध्यक्ष निलेश प्रकाश भुजबळ यांची निवड मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम. देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.
पुरंदर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणीची नियुक्ती नुकतेच जेजुरी (ता.पुरंदर) येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्ष योगेश कामथे , उपाध्यक्ष प्रविण नवले सचिव अमोल बनकर सहसचिव मंगेश गायकवाड, कोषाध्यक्ष निलेश भुजबळ तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून किशोर कुदळे, चंद्रकांत चौंडकर, समिर भुजबळ, संतोष डुबल, बाळासाहेब ननावरे, निखील जगताप, मामासाहेब गायकवाड, नितीन राऊत यांची निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी जाहीर केले. तर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन संतोष जंगम यांनी काम पाहिले.
दरम्यान यावेळी राज्य व जिल्हा कार्यकारणी साठी बाळासाहेब काळे, दत्तात्रय भोंगळे, प्रकाश फाळके, सुनिल लोणकर, राजेंद्र शिंदे, राहुल शिंदे, भरत निगडे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. तर पुरंदर तालुका सोशल मिडीया च्या समन्वयक पदी एन आर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी विजयकुमार हरिश्चंद्र, ए.टी.माने, महावीर भुजबळ, स्वप्निल कांबळे, रोहिणी पवार, विनय गुरव, विजयकुमार पवार, गिरीष झगडे, हनुमंत वाबळे, छाया नानगुडे, आजिम आत्तार, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सनदी
अधिकारी संभाजी झेंडे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सुदाम इंगळे, अॅड. श्रीकांत ताम्हाणे, माजी अध्यक्ष दत्तात्रय भोंगळे, कॉग्रसचे तालुकाध्यक्ष प्रदिप
पोमण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, अभिजीत जगताप आदिंनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी केले. तर आभार हल्ला विरोधी कृती समितीचे बाळासाहेब काळे यांनी मानले.