पुरंदरमध्ये राजकिय भूकंप!!!!                   माजी आमदारांच्या जाचाला कंटाळून त्यांच्याच गावच्या सरपंचांनी केला भाजपामध्ये जाहिर प्रवेश

पुरंदरमध्ये राजकिय भूकंप!!!! माजी आमदारांच्या जाचाला कंटाळून त्यांच्याच गावच्या सरपंचांनी केला भाजपामध्ये जाहिर प्रवेश

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावचे सरपंच सोमनाथ कणसे यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गावातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या जाचाला कंटाळून सोमनाथ कणसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गावच्या राजकारणात व तालुक्याच्या राजकारणासाठी ही धक्कादायक बाब आहे.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात ज्या गावाने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकवडे यांना प्रथम आमदार बनविले त्याच गावचे सरपंच आज भाजपाची वाट का धरतात हि खरच विचार करण्याची बाब आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या जाचाला कंटाळून मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे: सोमनाथ कणसे, सरपंच,जवळार्जुन

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मा.केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी दत्तक घेतलेले संसद आदर्श ग्राम गाव आहे.

गेल्या दोन वर्षापासून गावच्या ग्रामपंचायतींच्या राजकारणाचा व माझा काही संबंध नाही सरपंचांनी केलेले आरोप चुकीचे आहेत:अशोक टेकवडे,माजी आमदार पुरंदर हवेली.

ज्या गावातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने आमदार मिळाला अशा गावच्या सरपंचांनीच आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने नक्की या माजी आमदारांच्या गावात चाललंय तरी काय?असा प्रश्न सध्या पुरंदर तालुक्यात निर्माण झाला आहे.

यावेळी कल्याण आबा साळुंके,सोमनाथ साळुंके,बाळासाहेब कणसे सर,सुरेश बोंद्रे,नरसिंग कणसे,अंकुश साळुंके,भानुदास कणसे,प्रभाकर कणसे,प्रल्हाद कणसे, चांगदेव साळुंके,आप्पासाहेब जगताप,हनुमंत साळुंके,विठ्ठल कणसे,अजित कणसे यांचा भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे,भाजपा प्रवक्ते माधव भंडारी,मा.आमदार सुनीलभाऊ कांबळे आणि आमदार भिमराव आण्णा तापकीर,महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप,प्रदेश सहसंयोजक राजीव शर्मा,पश्चिम महाराष्ट्र संयोजक समाधान गायकवाड,पुणे महानगर संयोजक अनिल पाटोळे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *