पुरंदरमध्ये पहिल्यांदाच “या” गावात साजरा केला वृक्षांचा वाढदिवस

पुरंदरमध्ये पहिल्यांदाच “या” गावात साजरा केला वृक्षांचा वाढदिवस

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे येथे विराजविद्या ग्रुप च्या पुरंदर पॅराडाईज प्रकल्पामध्ये मागील वर्षी लायन्स क्लब,चतुर्शिंगी च्या देवराई उपक्रमांतर्गत देशी वृक्षांची लागवड करण्यात आली होती यासाठी विराजविद्या ग्रुप चे संचालक सौ विद्या जगताप व श्री विठ्ठल जगताप यांच्या वतीने जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती व सदर वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली होती.

आज या देवराईला एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लायन्स क्लब चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लब चे गव्हर्नर श्री अभय शास्त्री यांनी जगताप कुटुंबाचे वृक्षसंवर्धन केल्याबद्दल अभिनंदन करून सन्मान केला.

तसेच लायन्स क्लब च्या वतीने सामाजिक भान जपत आंबळेतील 20 गरजू महिलांना साडी देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व पाहुण्यांना खास गावरान मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास उपस्थित लायन्स क्लब चे रविंद्र गोलार,नितीन थोपटे,गिरीष कुळकर्णी,गुरूदत्त एग्रो चे विक्रमशेठ मांढरे,गावातील किशोर दरेकर,नंदकुमार जगताप व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *