पुरंदरमधील भयानक परिस्थिती!!!!!         प्रशासनाने जागे व्हावे; आमचे माळिण,इर्शाळवाडी होण्याची वाट पाहू नका; “या” गावातील नागरिकांची मागणी

पुरंदरमधील भयानक परिस्थिती!!!!! प्रशासनाने जागे व्हावे; आमचे माळिण,इर्शाळवाडी होण्याची वाट पाहू नका; “या” गावातील नागरिकांची मागणी

पुरंदर

खळद (ता.पुरंदर) येथे पावसाळ्यामध्ये क-हा नदीला महापूर येऊन या पुरामुळे गाव वाहून जाते की काय या भीतीपोटी येथील नागरिक पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून जगत असून संपूर्ण रात्र रात्र जागर करावा लागत असल्याची भयावह परिस्थिती गेले काही वर्षे येथे पहावयास मिळत आहे.


या गावच्या बाजूने क-हानदी वाहत असून २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्रीच्या वेळी क-हानदिने रौद्ररूप धारण केले होते. यापुरातून पावसाचे पाणी गावात ५० ते ६० फुट उंच असणा-या लोकवस्तीमध्ये शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली होती. तर यानंतर दरवर्षीच असे पुर गाव अनुभवत आहेत.


यावेळी मोठ्या प्रमाणावरती जीवीत व वित्त हानी झाली होती. यामध्ये अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला . या आठवणींच्या जखमा घेऊनच या भागातील नागरिक प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपला जीव मुठीत धरुण जगत आहे.या भागातील नागरिकांना कधीही शांत झोप लागत नाही.कधीही गावांमध्ये पाणी शिरून माळीण सारखी घटना घडत संपूर्ण गाव वाहून जाते की काय अशी भीती येथील नागरिकांना सतावत असते तर आता ईशाळवाडीच्या घटनेने यामध्ये आणखी भर पडली.


महापुराच्या काळात काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, यामुळे आम्ही वाचलो अशी संतप्त भावना व्यक्त करत आता तरी प्रशासनाने जागे व्हा, आमचा विचार करा, आमचे माळिण ,ईशाळवाडी होण्याची वाट पाहू नका अशी मागणी खळद येथील नागरीक करीत आहेत.


आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना,पदाधिकाऱ्यांना नागरिकांनी पत्र व्यवहार केला मात्र याची कोणीही दखल घेतली नसल्याने आज ही ईशाळवाडीची घटना घडल्यानंतर गावातील संतप्त नागरिक रविवारी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावरती येत असताना खळद मार्गे जेजुरीला जाणार असतील तर यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना निवेदन देण्याच्या पावित्र्यात नागरिक असल्याचे समजते.

गावाच्या बाजूने क-हा नदी वाहत असून संपूर्ण गावाला मोठ्या प्रमाणावरती धोका संभवतो, येथे संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे,जिल्हाधिकारी,गटविकास अधिकारी,माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, माजी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, अनेक सामाजिक संस्था यांच्यासह अनेक मान्यवरांना वारंवार पत्र व्यवहार करून संरक्षण भिंतिची मागणी केली आहे. मात्र अद्यापर्यंत याची कोणीही दखल घेतली नाही तरी भविष्याची मोठी हानी टाळण्यासाठी येथे संरक्षण भिंतीसाठी सर्वांच्या वतीने सामुदायिक प्रयत्न करीत मोठा निधी मिळणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *