पुरंदरमधील धक्कादायक घटना !!!! मुलानेच केला वडिलांवर कोयत्याने वार

पुरंदरमधील धक्कादायक घटना !!!! मुलानेच केला वडिलांवर कोयत्याने वार

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे मुलगा व पत्नी ची भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून वडीलांच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार केल्याची घटना घडली आहे.शामदास नामदेव तालवले यांनी फिर्याद दिली आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा याला फिर्यादीच्या पत्नीने जेवण करायचे आहे का? असे विचारले.

मुलगा हा दारू पिलेला असल्याने मला जेवण नको म्हणून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ दमदाटी करू लागला मात्र फिर्यादी हे पत्नीस शिवीगाळ करू नको असे म्हणाल्याच्या कारणावरुन मुलांनी घरातील लोखंडी कोयत्ता डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. फिर्यादीचा मोठा मुलगा भांडण सोडवण्यास आला असता त्याला हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.

सदर गुन्ह्याचा तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नांदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *