पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा!!!!!!!         पुरंदरचा भुमिपुत्र ऋतुराज गायकवाड बनला CSK चा कर्णधार

पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा!!!!!!! पुरंदरचा भुमिपुत्र ऋतुराज गायकवाड बनला CSK चा कर्णधार

पुणे

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज संघाचा नवा कर्णधार बनला आहे. 

एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे .त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप, आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर तो केवळ आयपीएल स्पर्धेत झळकत होताआपल्या नेतृत्वाखाली त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला ५ वेळेस चॅम्पियन बनवलं आहे. गेल्या २-३ वर्षांपासून धोनी आयपीएलला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

मात्र हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्याने कर्णधारपदावरुन माघार घेतली आहे. त्यामुळे हा त्याचा शेवटचा हंगाम असेल हे जवळ जवळ निश्चित झाले आहेआयपीएल २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्णधारांचसह ट्रॉफी फोटोशूट झालं. यावेळी सर्व १० कर्णधार उपस्थित होते.

कर्णधार म्हणून हे धोनीचं शेवटचं हंगाम असेल अशी चर्चा सुरु होती. मात्र धोनीऐवजी ऋतुराजला पाहुन क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करेल अशी पोस्ट चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच एमएस धोनीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने नव्या रोलचा उल्लेख केला होता. या निर्णयानंतर त्याचा नवा रोल काय होता हे स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *