पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!!!! ज्ञानदेव कोरडे यांना “कृषीरत्न” डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार जाहिर

पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!!!! ज्ञानदेव कोरडे यांना “कृषीरत्न” डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार जाहिर

पुरंदर

जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिक नाशिक तर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जंयंतीच्या निमित्ताने २७ डिसेंबरला राज्यातील प्रगतीशील,प्रयोगशील शेतकऱ्यांचा व कृषी पुरक व्यावसायिकांचा “कृषिरत्न “डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे.

“कृषिरत्न” या पुरस्कारांसाठी साई हायटेक नर्सरी सिंगापूर चे व्यवस्थापक व व्यवस्थापिका
मा.श्री.ज्ञानोबा सोनबा कोरडे (माऊली कोरडे) मु.पो.सिगापुर ता.पुरंदर,जि.पुणे.
व सौ.रंजना ज्ञानोबा कोरडे मु.पो.सिंगापुर,ता.पुरंदर,जि.पुणे यांची निवड झाली आहे.

पुरस्काराचे स्वरूप मेडल, सन्मानपत्र, ट्रॉफी, पैठणी साडी व इतर भेटवस्तू असे आहे. नाशीक येथे २७ डिसेंबर रोजी भव्य समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *