पुरंदरचे आमदार संजय जगताप व खासदारांचा “जलजीवन” वर डोळा : विजय शिवतारे

पुरंदरचे आमदार संजय जगताप व खासदारांचा “जलजीवन” वर डोळा : विजय शिवतारे

पुणे

पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अकार्यक्षमता मागच्या चार महिन्यात अचानक गडद होऊ लागल्याने या जोडगोळीने आता जलजीवन योजनेच्या कामांवर दावा करत भूमिपूजनाचा दिखावा मांडला आहे. महाविकास आघाडीच्या काळात पुरंदर तालुक्यात जलजीवन योजनेतून केवळ ६० कोटी रुपये मिळाले होते. पण राज्यात तख्तापलट झाल्यावर पुरंदरला जवळपास ३०० कोटी अधिकचा निधी मिळाला. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्याचे नियोजन केल्याचे समजताच आमदार खासदारांनी कुरघोडी करत स्वतःचं त्यावर डल्ला मारला. असे विजय शिवतारे म्हणाले.

पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात २०१९ नंतर निधीचा ओघ अचानक आटला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात केवळ बारामती आणि आंबेगाव या दोनच तालुक्यांना झुकते माप होते. पण सत्ता बदल झाल्यानंतर शिवतारे यांनी अवघ्या ३ महिन्यात सगळी उलथापालथ करून टाकली. विमानतळ, राष्ट्रीय बाजार, फुरसुंगी उरुळी पाणीयोजना, समाविष्ट गावांचा टॅक्स प्रश्न, १९ टक्क्यात पुरंदर उपसाचे पाणी असे विषय एका झटक्यात त्यांनी संपवून टाकले. पण हीच गोष्ट आमदार खासदारांनी का केली नाही असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊन या दोघांवर ‘बिनकामाचे’ असा शिक्का बसला होता. त्यातच पुन्हा जलजीवन मधून मोदी आणि शिंदे सरकारने निधीचा पाऊस पाडल्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आधी ताव मारण्यासाठी या दोघांची धांदल उडाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये एवढा निधी या दोघांनाही कधी आणता आला नाही. यांचं सरकार गेल्यावर निधी खेचून आणण्याइतके कार्यक्षम हे कधीपासून झाले असा सवाल आता लोक करीत आहेत.

शिवतारे यांचे खासदार आमदारांना सवाल :- खासदार सुळे आणि आमदार जगताप पुरंदर हवेलीच्या जनतेला उत्तरं द्या
१) विमानतळ बारामतीला का पळवले होते ?
२) जलजीवन योजना केंद्र आणि राज्याची. आपले पक्ष दोन्हीही ठिकाणी सत्तेत नाहीत. मग आपले या कामात योगदान काय ? आपलं सरकार असताना निधी देत नव्हता, मग सत्तेतून बाहेर फेकल्यावर आपली कार्यक्षमता वाढली काय ?
३) काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीत गुंजवणीच पाणी बारामतीला का पळवलं ?
४) आपलं सरकार आल्यानंतर गुंजवणी जलवाहिनीच्या कामाचा खोळंबा का झाला ?
५) फुरसुंगी उरुळी पाणीयोजनेसाठी २४ कोटी दिले नाहीत, मग बारामतीच्या एसटी स्टँडला २०० कोटी कसे दिलेत ?
६) फुरसुंगी उरुळी टॅक्सचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आपल्या दोघांसह आमदारांच्या अधिकारी असलेल्या भावाने दिलं होतं. ते का पाळलं नाही ?
७) आपण सरकारमध्ये येताच विजेचा दर तिप्पट वाढवून शेतकऱ्यांचे १९ टक्के दराने मिळणारे पुरंदर उपसा व जनाईचे पाणी बंद का केले होते ?
८) दिवे येथील राष्ट्रीय बाजार रद्द करून थेऊरच्या यशवंत कारखान्याच्या जागेत का पळवला होता ?
९) शिंदे सरकारने वरील बहुतांश प्रश्न फक्त ४ महिन्यात मार्गी लावले. मग लोकांनी आपल्याला मतं का द्यावीत ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *