पुण्यातील संतापजनक प्रकार!!! “तू मला आवडतेस”; शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला केला इंस्टाग्रामवर मेसेज

पुण्यातील संतापजनक प्रकार!!! “तू मला आवडतेस”; शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला केला इंस्टाग्रामवर मेसेज

पुणे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराच्या अनेक संतापजन घटना समोर येत आहेत. आधी बदलापूर त्यानंतर, मुंबई, पुणे, अकोला, दौंड त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे.

शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला ‘तू मला आवडतेस’ असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित स्कूल व्हॅन चालकावर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगलात चोप दिला.

त्यानंतर मनसैनिकांनी स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. बदलापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातही मुलींना छेडण्याचे प्रकार सुरू आहेत यामुळे पालक संताप व्यक्त करत आहेत, शाळेत आमची मुलं सुरक्षित नाहीत, कोणाच्या भरवश्यावर मुलांना पाठवावे असा सवाल ते उपस्थित करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *