पुण्यातील “या” पुलाजवळ मोठा अपघात;ब्रेक फेल झालेला कंटेनर चार वाहनांना धडकला

पुण्यातील “या” पुलाजवळ मोठा अपघात;ब्रेक फेल झालेला कंटेनर चार वाहनांना धडकला

पुणे

पुण्यातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेला कंटनेर चार वाहनांना धडकल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात २ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरवळवरून फ्रिज व इतर साहित्य घेऊन निघालेला कंटेनर नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आला. त्याचवेळी कंटेनरचा ब्रेक फेल झाला. या ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने समोर असणाऱ्या दोन चारचाकी , एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली.या अपघातात दोन जण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली.

या अपघात प्रकरणी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.