पुण्यातील धक्कादायक घटना!!!उच्चशिक्षित तरुणीला इंटरव्यूसाठी बोलावलं अन् चौघांनी केला….

पुण्यातील धक्कादायक घटना!!!उच्चशिक्षित तरुणीला इंटरव्यूसाठी बोलावलं अन् चौघांनी केला….

पुणे

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कौटुंबिक कलह, अनैतिक संबंध,महिलांवरील अत्याचार या सारख्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत.

त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये उच्चशिक्षित २८ वर्ष तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उधळी आहे.

बी.कॉमचे शिक्षण घेतलेल्या २८ वर्षीय तरुणीला नोकरी निमित्त इंटरव्यूसाठी बोलावलं. त्यानंतर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

२८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिंपरी आणि पुण्यात तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिंपरी पोलिसांकडून गुन्हा लष्कर पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आलाय. 

पश्चिम बंगाल येथील २८ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. ऑनलाइनद्वारे नोकरी शोधत असताना एका तरुणीचा तिला नंबर मिळाला. तिच्याशी पीडित तरुणीने संपर्क केला. संबंधित मुलीने पुण्यातील हिंजवडीत पीडितेला इंटरव्यूसाठी बोलवण्यात आलं.

विश्वासाने ती पुण्यात आली. मात्र हा सगळा प्रकार घडल्या नंतर अखेर तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर पुणे शहरातील लष्कर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *