पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!!!!! दोरी,टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!!!!! दोरी,टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

पुणे

खिडकीला दोरी आणि टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदिती दत्तात्रय कुलकर्णी (वय ७, रा. मल्हारीनगर, आंबेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.आदिती पहिलीत शिकत होती. ती एकुलती एक होती.

आदिती घराच्या खिडकीला बांधलेल्या झोका खेळत होती. तिची आजी घरात होती. आई आणि वडील दोघेही कामावर गेले होते. टॉवेल आणि दोरीने तिने झोका बांधला होता. झोक्यावरून तिचा अचानक तोल गेला आणि त्याचा फास तिला बसला.

तिच्या आजीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव घेतली. त्यांनी फास सोडवला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *