पुणे जिल्ह्यातील “या” मोठ्या गावच्या माजी उपसरपंचांना लाकडी दांडके व दगडाने केली जबर मारहाण

पुणे जिल्ह्यातील “या” मोठ्या गावच्या माजी उपसरपंचांना लाकडी दांडके व दगडाने केली जबर मारहाण

पुणे

पुणे जिल्ह्यातील ऊरुळी कांचन येथे तुपे वस्ती याठिकाणी रस्त्याच्या कामाच्या वादातुन चार- पाच जणांनी लाकडी दांडके व दगडांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

भाऊसाहेब महादेव तुपे (रा. तुपे वस्ती, ऊरुळी कांचन) असे मारहाण झालेल्या उपसरपंचांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासुन तुपे वस्ती येथील तीनशे मीटर रस्त्याचे काम रखडलेले आहे. सदर रस्त्यासाठी जागेचा वाद चालु होता.या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने समाजकल्याण निधीतुन तीन लक्ष रुपये निधी मंजुर केला आहे.

या रस्त्याचे काम प्रत्यक्ष भाऊसाहेब तुपे हे तेथे हजेरी लावत पाहत असताना या ठिकाणी अचानक चार-पाच जणांनी तुपे यांना जाब विचारुन त्यांना लाकडी दांडके व दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर हल्लेखोर हल्ला करुन पसार झाले.डोक्यात दगडाचा मार लागल्याने भाऊसाहेब तुपे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *