पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायत निवडणुकीत अभुतपुर्व बॅनर !!!! समाजकंटक,भ्रष्टाचारी लोकांनी मत मागायला आल्यास “…… “ करण्यात येईल

पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायत निवडणुकीत अभुतपुर्व बॅनर !!!! समाजकंटक,भ्रष्टाचारी लोकांनी मत मागायला आल्यास “…… “ करण्यात येईल

पुणे

बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदाला डावलण्यात आल्याने केळीचे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. याची चर्चा जिल्हाभर झाली होती.बारामती तालुक्यातील वाघळवाडीसह १३ ग्रामपंचायत च्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १३ तर सदस्यपदासाठी ६१ जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

दि ५ रोजी झालेल्या अर्ज छाननी मध्ये एका सदस्यपदाच्या उमेदवाराचा अर्ज अवैद्य ठरला असून ६० उमेदवार सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे.यामध्ये किती उमेदवार माघार घेतात ते समजणार आहे. 
             
वाघळवाडी येथील सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत आपल्या घरावर एक बॅनर लावला असून तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचारीला अभय देणाऱ्या उमेदवार यांनी मत मागायला आल्यास अपमान केला जाईल अशा आशयाचे बॅनर लावले आहे. यादव यांच्या घरात पाच मते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *