पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र, पैकी एक माजी उपसरपंच

पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र, पैकी एक माजी उपसरपंच

दौंड

दौंड तालुक्यातील दापोडी ग्रामपंचायतीचे सदस्य सिताराम देशमुख व माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य मंजुश्री रुपनवर यांच्या नातेवाईकांचे शासकिय गायरान जमीनीवर अतिक्रमण आढळुन आल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदी राहण्यासाठी अपात्र ठरवण्यात येत आहे.असा आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अर्जुन टुले व अशोक नरुटे हे या विरुद्ध अनेक दिवसापासुन लढा देत होते.

ग्रामपंचायत दप्तरी या दोन्ही सदस्यांच्या नावे प्रत्यक्ष अतिक्रमणाची नोंद नाही.असे असले तरी एकत्रित कुटुंबात राहणार्या इतर सदस्यांच्या नावे ही नोंद आहे.

दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार या अतिक्रमणास संबंधीत सदस्यांना जबाबदार धरुन त्यांना अपात्र ठरविले आहे,असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल असे सरपंच नंदा भांडवलकर यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *