पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतला मिळाली ओझोन घंटागाडी भेट

पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतला मिळाली ओझोन घंटागाडी भेट

सरपंच वैभव गायकवाड यांच्या प्रयत्नांना आले यश

बारामती

करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांतुन व मा. प्रमोद काका काकडे, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद, पुणे यांच्या सौजन्याने ग्रामपंचायत करंजेपुल यांना केंद्र पुरस्कृत १५ वा वित्त आयोग जि. प. स्तर सन २०२०-२१ अंतर्गत ओझोन घंटागाडी भेट मिळाली.

सदर गाडीचा लोकार्पण सोहळा मा. प्रमोदकाका काकडे, सभापती बांधकाम व आरोग्य समिती, जिल्हा परिषद, पुणे, लक्ष्मणराव गोफणे, संचालक, सोमेश्वर कारखाना, अभिजित काकडे, संचालक, सोमेश्वर कारखाना, ऋषिकेश गायकवाड संचालक, सोमेश्वर कारखाना यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी उपसरपंच निलेश गायकवाड, मा. सरपंच, आप्पासाहेब गायकवाड, मा. चेअरमन, करंजे सोसायटी कैलास मगर, सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, माजी सैनिक नितीन शेंडकर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व परिसर स्वच्छ रहावा यासाठी सर्वांनी घंटागाडीचा उपयोग करण्याचे आवाहन याप्रसंगी सरपंच वैभव गायकवाड व ग्रामसेविका सुजाता आगवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *