पुणे जिल्ह्यातील “या” गावात हिट अँड रनचा बळी!                      भरधाव कारने महिला व तीच्या मुलाला चिरडले,दोघांचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील “या” गावात हिट अँड रनचा बळी! भरधाव कारने महिला व तीच्या मुलाला चिरडले,दोघांचा जागीच मृत्यू

पुणे

दौंड तालुक्यातील खडकी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर हृदय पिळवून टाकणारा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये मायलेकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात ३८ वर्षीय महिला व तिच्या ११ वर्षीय मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला.यामध्ये मयत रूपाबाई सीताराम सावंत (वय ३८) व मुलगा संग्राम सीताराम सावंत (वय ११ वर्ष, दोघे रा.खडकी, ता. दौंड) यांचा समावेश आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 8 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास खडकी गावच्या हद्दीत हा अपघात घडला.पुण्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने (क्र एम.एच१२ एक्स.क्यू.०२०१) या दोघां मायलेकांना जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भयानक होता की या भीषण अपघातात दोघे मायलेक जागीच ठार झाले.

धडक दिल्यानंतरही कारचालक थांबला नाही आणि जखमींना मदत न करता तो कारसह फरार झाला. मात्र, वाहनाची नंबर प्लेट, (एम.एच१२ एक्स.क्यू ०२०१) पुरव्यासाठी घटनास्थळी मिळाली असून या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *