पुणे जिल्ह्यातील “या” गावात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले;तरुणीचा जागीच मृत्यु तर तरुण गंभीर जखमी

पुणे जिल्ह्यातील “या” गावात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले;तरुणीचा जागीच मृत्यु तर तरुण गंभीर जखमी

पुणे

पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका मध्यधुंद कारचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी रात्री खराडी परिसरात घडली.  सोनाली अविनाश रोकडे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तिचा मित्र अभिषेक अशोक गायकवाड गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे. अशोक नामदेव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सोनाली आणि तिचा मित्र अभिषेक गुरुवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन घरी जात होते. खराडी परिसरात एका मध्यधुंद कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती, की सोनाली आणि तिचा मित्र उंच उडून जमिनीवर आदळले. या घटनेत सोनालीचा जागीच मृत्यू झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *