पुणे
पुणे- सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील मळद ग्रामपंचायत हद्दीत खासगी आराम बस व चारचाकी गाडीचा अपघात झाला. बलवंत विश्वनाथ तेलंगे (वय-३५, सध्या रा. भोसरी, पुणे. मूळ रा. सोमनाथपूर, ता. उद्गगीर, जि. लातूर) व नामदेव जिवन वाघमारे (वय-१८, रा. भोसरी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मृत्यू झालेल्या दोघांचे एकमेकांचे दाजी मेव्हणे असे नाते आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये चारचाकी गाडी ही दीडशे फूट खोल बोगद्यात पडल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (ता. २४) मध्यरात्री घडली आहे. पुण्याहून बुधवारी मध्यरात्री चारचाकी गाडीतून बलवंत तेलंगे व नामदेव वाघमारे हे दोघे पुण्याहून गावाकडे चालले होते. यावेळी वाटेत त्यांना मृत्यूने अडवलं.दरम्यान, या अपघातात चारचाकी गाडीतील बलवंत तेलंगे व नामदेव वाघमारे या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन कालव्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते.दोन्ही वाहने कुरकुंभ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.