पुणे जिल्ह्यातील “या” गावात तीन वाहनांचा भीषण अपघात;नऊ जण जखमी,दोघांची प्रकृती चिंताजनक

पुणे जिल्ह्यातील “या” गावात तीन वाहनांचा भीषण अपघात;नऊ जण जखमी,दोघांची प्रकृती चिंताजनक

पुणे

पुणे – सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार व दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातातील आयशर टेम्पो हा पुण्याकडे निघाला होता. तर दुसरी चारचाकी गाडी हि सोलापूरच्या दिशेने निघाली होती. या टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या.

यावेळी टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तो थेट सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला.

यावेळी या टेम्पोने शेजारुन निघालेल्या एका दुचाकीलाही धडक दिली. अपघात एवढा भीषण होता कि टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. तसेच या धडकेत दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी व त्यांच्या दोन मुलांना किरकोळ मार लागला आहे तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्तीही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

या अपघातातील जखमींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *