पुणे जिल्ह्यातील “या” गावातील ग्रामपंचायत ग्रामसभा अंगणवाडी सेविका असणार्या “या” रणरागिनेने गाजवली ; अंगणवाडी भरते कोंबड्यांच्या खुरवड्यात, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचे बेताल वक्तव्य ??

पुणे जिल्ह्यातील “या” गावातील ग्रामपंचायत ग्रामसभा अंगणवाडी सेविका असणार्या “या” रणरागिनेने गाजवली ; अंगणवाडी भरते कोंबड्यांच्या खुरवड्यात, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचे बेताल वक्तव्य ??

पुणे

आज यवत ग्रामपंचायत वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सरपंच यांनी विविध योजना बद्दल माहिती दिली,अनेकांचे तक्रार अर्ज देखील वाचून दाखवले,यावेळी शीतल दोरगे यांनी वार्ड क्रं १ मध्ये बंदिस्त गटार लाईन करण्यासाठी सरपंच समीर दोरगे यांना खडे बोल सुनावले,शीतल दोरगे यांनी वार्ड क्र.१ मधील अनेक महिलांना घेऊन ग्रामसभा दणाणून सोडली.

यवत येथील लोक वसाहतीमध्ये मोबाईल कंपनी चा टॉवर बसवू नये यासाठी काही नागरिकांनी ग्रामसभेत विषय मांडला,गावातील जेष्ठ नागरिक श्री प्रकाश अदापुरे यांनी यावेळी ग्रामसभेत “टॉवर चे काम दोरगे किंवा यादव यांच्या दारात असते तर केव्हाच बंद पडले असते असे सांगितले.यावर सरपंच स्मीर दोरगे यांनी तात्काळ उपाययोजना करू असे आश्वासन दिले व स्थानिक असो बाहेरून कामानिमित्त राहणारा असो मी सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितले.

यवत येथील इंदिरानगर वस्तीतील अंगणवाडी क्रं – १ येथे १६ वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती सुकेशनी संजय गायकवाड यांनी ग्रामसभेत सरपंच समीर दोरगे व ग्रामविकास अधिकारी चखाले यांच्यावर उलटसुलट उत्तरे देत असल्याचा आरोप करत चांगले धारेवर धरले, लहान मुलांची अंगणवाडी अनेक वर्षांपासून खासगी मालकीच्या एका कोंबड्याच्या खुरवड्यात भरत असून आता ती खोली देखील मोडकळीस आली आहे ,भाडे थकीत आहे अश्या परिस्थितीत आम्ही मुलांना उघड्यावर शिक्षण देत आहोत परंतु सरपंच समीर दोरगे यांना अंगणवाडी जागा उपलब्ध करणेबाबत कायम मागणी केली परंतु त्यांनी “मी ६ नं वार्डातून निवडुन नाही आलो”असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली तर ग्रामविकास अधिकारी चखाले यांना थकीत भाडे व जागा उपलब्ध करणेबाबत विचारणा केली असता वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करून घरी बसा असा खोचक सल्ला दिला असे श्रीमती सुकेशनी गायकवाड यांनी सांगितले.

सरपंच समीर दोरगे यांनी सदर अंगणवाडी सेविकेचा आरोप फेटाळून लावला,जागा उपलब्ध होत नसल्याने अडचण आहे असे सांगितले तर ग्रामविकास अधिकारी चखाले यांनी देखील अंगणवाडी सेविका यांना वारंवार सांगितले आहे की,काही त्रुटी अभावी अंगणवाडी चे काम रखडले आहे.

ग्रामसभेत सरपंच समीर दोरगे यांनी भाऊसाहेब चखाले यांच्यातर्फे श्रीमती सुकेशनी गायकवाड यांची दिलगिरी व्यक्त करत लवकरच अंगणवाडी बाबत निर्णय घेऊ असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *