पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या सरपंचांनी गोरगरिबांची दिवाळी केली गोड ; तब्बल पाचशे पंचावन्न कुटुंबांना स्वखर्चाने केले “या” वस्तुचे वाटप

पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या सरपंचांनी गोरगरिबांची दिवाळी केली गोड ; तब्बल पाचशे पंचावन्न कुटुंबांना स्वखर्चाने केले “या” वस्तुचे वाटप

पुणे

वाघळवाडी-सोमेश्वरनगर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ नंदाताई राजकुमार सकुंडे यांनी स्वतःच्या खर्चाने वाघळवाडी  नागरिकांच्या ५५५ कुटुंबाच्या घरोघरी जाऊन ११११ किलो साखरेचे वाटप केलेवाघळवाडी-सोमेश्वरनगर,  ता.बारामती या ठिकाणी कन्नडवस्ती, लोखंडीपूल, सावंतवस्ती, आंबेडकर वसाहत, सोमेश्वर कारखाना परिसर व गावातील इतरत्र सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन दिवाळीनिमित्त ५५५ कुटुंबांना ११११ किलो साखरेचे वाटप करण्यात आले.

वाटप करतेवेळी सरपंच स्वतः घरातील महिलांना भेटून दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतच्या विकास कामांच्या व महिलांच्या अडी अडचणी समजावून घेतल्या व आपण उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगून विश्वास दिला.

काही महिलांनी ह्या पंचवार्षिकमध्ये सरपंच ताईंनी व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी अतिशय चांगले कामकाज व गावचा न भूतो, ना भविष्य असा सर्वांगीण विकास झालेला आहे व सरपंच स्वतः आमच्या दारापर्यंत येतात आमच्या शुभ कार्यात व सुखदुःखात साठी त्या धावून येत असतात, आधार देत असतात व यापुढेही आपणच सरपंच व्हावे  महिला आवर्जून सांगत होते. 

उपस्थित युवा कार्यकर्ते श्री.तुषार सकुंडे बचत गट अध्यक्ष श्रीमती. लताताई घोरपडे सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत, गणेश सावंत, केदार सकुंडे, अक्षय सावंत, गौरव शिंदे, ओंकार सावंत, सुरेश शिंदे, राहुल हरिहर, हे सर्वजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *