पुणे जिल्ह्यातील भयंकर प्रकार !!!!    विद्यार्थ्याचे केस खेचले, लाथाबुक्क्यांनी मारले; शिक्षकांनी केली क्रूर शिक्षा

पुणे जिल्ह्यातील भयंकर प्रकार !!!! विद्यार्थ्याचे केस खेचले, लाथाबुक्क्यांनी मारले; शिक्षकांनी केली क्रूर शिक्षा

पुणे

महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिक्षकांना पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

आकरावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना २१ जानेवारी घडल्याची माहिती आहे. ज्ञानमंदिर जुनियर कॉलेज आळे येथे हा प्रकार घडला आहे.

शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीही शहानिशा न करता शाळेतील शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा- बुक्यांनी जबर मारहाण केली.

माझी काहीच चूक नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये घटनेचे चित्रिकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होतो.

ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्काळ बैठक बोलावली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीसह पालकांकडून विद्यालयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *