पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! दारू पिण्यास आजोबांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून नातवाने केली आजोबांची हत्या

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! दारू पिण्यास आजोबांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून नातवाने केली आजोबांची हत्या

पुणे

पुणे जिल्ह्यातून नातू आणि आजोबांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील आपटी गावात घडली आहे. सदर घटना शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या आपटी गावात भयंकर घटना घडली आहे. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांच्या डोक्यात लाकडी बॅट घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश आनंदा पारठे असे नातवाचे नाव आहे. तर नथू पारठे असे हत्या झालेल्या आजोबांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेशने शनिवारी रात्री आठच्या दरम्यान आजोबाकडे दारू पिण्यास पैसे मागितले. परंतु आजोबांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रथमेशने घरासमोरच आजोबांच्या डोक्यातच लाकडाची बॅट हाणली.

त्यामुळे ७० वर्षीय आजोबा नथू पारठे रक्तबंबाळ झाले. नातवाने आजोबांच्या डोक्यावर लाकडी बॅट मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. आजोबांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली.

आजोबाच्या हत्येनंतर याप्रकरणी आरोपी प्रथमेश पारठे विरुद्ध भोर पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपास करून २४ तासांच्या आत आरोपी प्रथमेश पारठेला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *