पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना !!!!!!              बापानेच मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खुन

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना !!!!!! बापानेच मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खुन

बारामती

बापानेच आपल्या मुलाचा कोयत्याने सपासप वार करून खुन केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पारवडी या गावी घडली आहे.याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने वन विभागाच्या झाडीत लपलेला आरोपीला अटक केली आहे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली.पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या तीन तासात अटक केली आहे.

पारवडी गावचे पोलीस पाटलांनी आपल्या गावात खून झाल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिस निरीक्षक ढवाण यांनी घटनास्थळी धाव घेतली तपासामध्ये आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावच्या हद्दीत आला असून त्याचा मुलगा गोपीनाथ त्याच्यासोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते.या वादातून आरोपीने रागाच्या भरात मुलाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून खुन करुन पळून गेल्याची माहिती समोर आली आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शोध पथक आरोपीच्या मागावर पाठवण्यात आले.

आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होते तसेच त्याचा कोणी नातेवाईक नसल्याने आरोपीचा फोटो मिळणे अवघड होते. पोलिसांनी घटनास्थळापासून वनविभागाचा दहा ते पंधरा किलोमीटर परिसर पायी चालत आरोपीचा शोध घेतला.झाडीत लपलेल्या आरोपीला पोलिसांनी केवळ तीन तासात बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल पांढरे,नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *